Top News

बल्लाशाह आलापल्ली मार्गावर कळमना जवळ भीषन अपघात एकाचा जागीच मृत्यू......

 बल्लाशाह आलापल्ली मार्गावर  कळमना जवळ भीषन अपघात एकाचा जागीच मृत्यू......



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

बल्लारशाह शहरातून आष्टी-गोंडपिपरी आलापल्ली कडे जाणारा मार्ग दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. 

अपघाताचे सत्र थांबता थांबे नाही नुकतेच कॅप्सूल ट्रकच्या अपघातात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आज सायंकाळी 7:00 वा बल्लारशाह तालुक्यातील कोर्टी मक्ता येथील सचिन दादाजी गायकवाड वय-27 या युवकाचा कळमना बांबु डेपो जवळ ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली विशेष म्हणजे सदर युवक अविवाहित होता या अपघाताचे वृत्त गावकऱ्यांना कळताच स्थानिक नागरिकांनी बल्लारशाह ते गोंडपिपरी रस्ता अडवून सायंकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत चक्का जाम आंदोलन केले.

 तदनंतर बल्लारशाह पोलिस व प्रशासनाच्या हस्तक्षेप व मध्यस्थी नंतर सदर मार्ग वाहतुकीसाठी मोकळा कऱण्यात आला. 

सदर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास बल्लारशाह पोलिस करीत आहेत.

Previous Post Next Post