अखेर अडेगाव-खातेरा-येडत विध्यार्थी बस फेरी झाली सुरू....
विध्यार्थीनी मानले युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांचे आभार......
विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव
मागील कोरोना आपत्ती पासून विध्यार्थी बस फेऱ्या बंद होत्या त्यात आता महाराष्ट्र मध्ये सर्व शाळा महाविद्यालया सुरू झाले आहेत यातच झरी जामनी तालुक्यातील शाळा सुद्धा सुरू झाल्या होत्या पण विध्यार्थी ये जा करण्याऱ्या बस फेऱ्या मात्र बंद होत्या यातच तालुक्यातील बस सेवा सुरू करण्या करिता युवा नेते मंगेश पाचभाई यांनी निवेदन देऊन झरी तालुक्यातील मानवविकास बस फेऱ्या सोबतच विध्यार्थी फेऱ्या सुरू करण्या करिता निवेदन दिले होते.
याच निवेदनाची दखल घेऊन मुकुटबंन,-अडेगाव-खातेरा व इतर विध्यार्थी बस फेऱ्या सुरू झाल्या बस फेऱ्या सुरू झाल्याने विध्यार्थी यांचे आर्थिक भुदंड वाचला याच करिता युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांचे विध्यार्थी व विध्यार्थींनी आभार मानले या
पूर्वी सुद्धा अडेगाव खातेरा बस फेऱ्या संदर्भात मंगेश पाचभाई यांनी निवेदन देऊन सुरू केल्याची चर्चा संपूर्ण परिसरात आहे हे विशेष या वेळी
सरपंच सीमा लालसरे,शंकर पाचभाई,जेष्ठ नागरिक नामदेव ठमके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राहुल ठाकूर,गिरीधर राऊत,संतोष पारखी,विजू लालसरे,प्रनल गोंडे,विजय लालसरे ,रवींद्र जिवतोडे,निखिल देठे, राजूचौधरीं,दिनेश जिवतोडे आदी उपस्थित होते !



