अखेर त्या मृतदेहाची ओळख पटवीन्यात बल्लारशाह पोलिसांना आले यश......
बल्लारशाह शहरातील बुध्दनगर वॉर्ड येथे आढळला होता अनोळखी इसमाचा मृतदेह......
बल्लारशाह पोलिसांनी केले होते ओळख पटविण्याचे आवाहन......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
बल्लारशाह शहरातील बुद्धनगर वार्ड येथे काल अनोळखी व्यक्तीचा मृत्य देह आढळुन आला,सदर मृत्य देहा बाबद काल दि .०६/०७/२०२२ रोजी फिर्यादी नामे दौलतरामसिंग लक्ष्मणसिंग बुंदेल, वय ५० वर्ष, रा . रविंद्रनगर वार्ड बल्लारशाह यांनी पो.स्टे .बल्लारशाह येथे रिपोर्ट दिली की, काल दि . ०६/०७/२०२२ रोजी सकाळी दरम्यान कल्पना लॉज जवळ , बुध्दनगर वार्ड , बल्लारशाह येथे रोडवर एक अनोळखी पुरूष मृत अवस्थेत रोडवर पडुन आहे . अशा रिपोर्ट वरून पो.स्टे . बल्लारशाह येथे मर्ग क्रमांक ४७/२२ कलम १७४ जा.फौ. अन्वये नोंद करूश अधीक तपास पोलिस निक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात चौकशी अधिकारी प्रमोद एस.रासकर सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारशाह यांनी केला सदर युवक हा लालपेट काॅलनी नंबर 1 येथील रहीवाशी असुन सदर मृतकाची वय 27वर्ष असून नाव सुरज विश्वेश्वर कोडापे असे आहे.

