Top News

क्रिडा संकुलाच्या माध्यमातुन परिश्रम घेत खेडाळुंनी क्रिडा क्षेत्रात भरारी घ्यावी - हरीश शर्मा

क्रिडा संकुलाच्या माध्यमातुन परिश्रम घेत खेडाळुंनी क्रिडा क्षेत्रात भरारी घ्यावी - हरीश शर्मा


बल्लारशाह येथिल तालुका क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे विधीवत शुभारंभ संपन्न.......



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

माजी अर्थ नियोजन व वनमंत्री (म.रा.)आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तालुका स्तरावर क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यांसाठी पोषक वातावरण तयार व्हावे करीता बल्लारशाह येथे अथक प्रयत्नाने क्रिडा संकुल उभारले.

या क्रिडा संकुलाचे रितसर उदघाटन सुध्दा झाले असतांनाही वैष्वीक स्तरावर थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून क्रिडा संकुलातील जलतरण तलाव बंद होते.

आजच्या घडीला कोरोणाची साथ मंदावली असल्याने दिनांक 6/7/ 2022 रोजी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.हरिश शर्मा यांच्या शुभहस्ते या तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे विधिवत शुभारंभ करून जलतरण पट्टुं करिता खुले करण्यात आले.

यावेळी बल्लारशाहचे तहसीलदार संजय रांईचवार,किशोर पंदीलवार ,सुनिलसिंग बैस,सदानंद बुध्दार्थी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.


Previous Post Next Post