Top News

त्वरीत नियोजन करून संपूर्ण शहरात फॉगिंग करण्यात यावी - अफजल अली शहर सहसंयोजक आम आदमी पार्टी,बल्लारशाह

प्रत्येक नागरिकाच्या जीवाचे रक्षण करणे ही शासन व प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे.....


त्वरीत नियोजन करून संपूर्ण शहरात फॉगिंग करण्यात यावी - अफजल अली शहर सहसंयोजक आम आदमी पार्टी,बल्लारशाह


आप चे नगर परिषद बल्लारशाह ला निवेदन......



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

आम आदमी पार्टी, बल्लारशाह, शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शना खाली 20 जुलै 2022 रोजी शहर सहसंयोजक अफजल अली यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

पावसाळा सुरू झाला आहे, बल्लारशाह शहरात अनेक नाल्या खड्डे भरले आहेत, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा झुडपेही वाढली आहेत, याकडे सफाई कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे.

महिलांना सकाळ-संध्याकाळ घरी काम करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शहरातील नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांनी ग्रासले असून, शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची झुंबड पाहायला मिळत आहे. 

 डेंग्यू या आजाराने अनेक तरुणांना जीव गमवावा लागत असल्याने बल्लारशाह शहरातील कचरा, झुडपे साफ करून, साचलेल्या पाण्यात औषध फवारणी करून, प्रत्येक नागरिकाच्या जीवाचे रक्षण करणे ही शासन व प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे, त्वरीत नियोजन करून संपूर्ण शहरात फॉगिंग करण्यात यावी असे या निवेदनात अफजल‌ अली यांनी म्हंटले आहे.

 निवेदन देताना शहर सहसंयोजक अफजल अली, शहर महिला सह संयोजिका सलमा सिद्दीकी, शहर सचिव ज्योताताई बाबरे, संघटन मंत्री सरिताताई गुजर, दुर्गाताई शेंडे, रोहित जंगमवार, प्रशांत गदाला आणि इतर अनेक क्रांतिकारी साथी उपस्थित होते.

Previous Post Next Post