Top News

विदर्भ चंडीका माते स्मरण.....तुझ्या समोर ठीय्या आंदोलन

विदर्भ चंडीका माते  स्मरण.....तुझ्या समोर ठीय्या आंदोलन - विदर्भवादी कवि वसंत गवळी गोंदिया,विदर्भ





विदर्भ चंडीका  माते  स्मरण 

तुझ्या समोर ठीय्या आंदोलन 

निर्दयी ठरले प्रत्येक शाशन

विद र्भाचे केले फक्त शोषण 


माते तुला घालतो साकडे 

लक्ष देना थोडे ईकडे 

गुलामगिरीतून कर मोकळे 

शिकार करत आहेत ढोंगी बगळे 


सदबुध्दि दे या मुर्ख जनांना

विदर्भातीलच विवेक शुन्यांना

सत्तेसाठी आसुसले  पाय चाटण्या

दाखव चमत्कार उडव ठीणग्या



कीत्येक तुझे उपासक झाले कुर्बान 

कीत्येकानी ठेवले तुझ्या चरणी  प्राण 

विश्वास तुझ्यावर तुझी कीर्ती महान

स्वतंत्र विदर्भाची भागव आमची तहान 


माणसावरील विश्वास पुर्ण उडाला 

व्यवस्थेला लागला भ्रष्टाचारी कीडा

जात धर्म भाषा पैसा त्याची पीडा 

शाशन प्रशासन मीडीया न्याय ही तोकडा


हीच समज आता आमची आरती 

नको घेऊ कुणाची आता आहुती 

महागाई बेरोजगारी पाणी टंचाई भीती 

कशी होईल गरीब शेतक-यांची शेती 



कवि - विदर्भवादी वसंत गवळी, गोंदिया,विदर्भ







Previous Post Next Post