बल्लारशाह पोलीस स्टेशनला कार्यरत महिला पोलिस मोनल मेश्राम यांचे राजूरा येथे अपघाती निधन.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
बल्लारशाह पोलीस स्टेशनला कार्यरत महिला पोलिस कर्मचारी मोनल मेश्राम ह्यांच्या दुचाकीला राजुरा येथे मुख्य महामार्गावर पाठी मागुन येणाऱ्या आयचर वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार महिला पोलिस कर्मचारी मोनल मेश्राम ह्या आपले कर्तव्य बजावून एम.एच ३४ एटी १८७७ क्रमांकाच्या म्यास्ट्रो दुचाकीने बल्लारशाह येथुन राजुरा येथे आपल्या राहत्या घरी परत जात असतांना पाठी मागून येणाऱ्या एम एच २९ बिई ४१५८ क्रमांकाच्या आयचर ट्रक ने धडक दिली. धडक बसताच त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्या खाली कोसळल्या व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात महावितरण विभागात कार्यरत पती विलास बनकर व दोन लहान मुले आहेत.

