Top News

Investigate_Paper_Mill_Bamboo_Depot_Fire_and_Take_Action_on_Paper₹Mill₹Administration_-_MLA_Kishor_Jorgewar

पेपरमिलच्या बांबू डेपोला लागलेल्या आगीची चौकशी करून पेपरमिल प्रशासनावर कारवाही करा - आमदार कीशोर जोरगेवार



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड) 

काल ‌दुपारच्या सुमारास पेपरमिलच्या कळमना येथील बांबू डेपोला लागलेली आग वेळेत नियंत्रणात आणण्यात पेपर मील येथील व्यवस्थापनाला अपयश आले. येथे अश्या परिस्थितीशी निपटण्यासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती, परिणामी आग पसरली. यात एक पेट्रोलपंपही जळाला ही घटना पेपर मिल प्रशासनाचा बेसावधपणा उघळ करणारी आहे. 

त्यामूळे या प्रकरणाची चौकशी करून पेपर मिल प्रशासनावर कारवाही करण्यात यावी, तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल, विशेष म्हणजे चीचपल्ली येथिल बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीतही आग विझविण्याचे कोणतेही उपकरण नसल्याने आग पसरल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वारंवार घडत असलेल्या या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे अशे मत आमदार कीशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले .

Previous Post Next Post