उद्या विज्ञान भारती (vibha) आणि ट्विंकल इंग्लिश स्कूल च्या संयुक्त विद्यमाने नागभीड शहरात साकारणार विज्ञान शिबिर.....

उद्या विज्ञान भारती (vibha) आणि ट्विंकल इंग्लिश स्कूल च्या संयुक्त विद्यमाने नागभीड शहरात साकारणार विज्ञान शिबिर.....


आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ही अनोखी व स्मरणीय संधी प्रथमच उपलब्ध झाली. - प्रचार्या शुभांगी पोहेकर


नागभीड :: समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर यांच्या मार्गदर्शनात विज्ञान संस्कार शिबिराचे आयोजन दिनांक २७ एप्रिल २०२५ ते ४ मे २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.

रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी 9:00 वाजता डॉ.प्रा.अमीर धम्माणी, प्रा. रजनी चिलबुले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून यावेळी संस्थाध्यक्ष गणेश तर्वेकर, संस्था सचिव अजय काबरा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,विज्ञान भारती चे डॉ.दिवाकर शिंदे, मनिषा घारे कार्यकारी सदस्य वि.भा.  व विज्ञान क्षेत्रातील तज्ञ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तर डॉ. आनंद हरकरे,  डॉ. मनीष माटे, डॉ. अभिजित पाटील, डॉ. प्रियंका धाईत, प्रा. निलेश गोडे हे सुद्धा उपस्थित रहाणार आहेत.

या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती, कुतूहलाचे परिमार्जन व विज्ञान जिज्ञासा निर्माण होईल. प्रस्तुत शिबिर दोन सत्रामध्ये असून पहिल्या

सत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे व दुसऱ्या सत्रात विज्ञान विषयातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करतील. यात तालुक्यातील विविध शाळेतील इयत्ता 7वी ते 9वी च्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. 

आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ही अनोखी व स्मरणीय संधी प्रथमच उपलब्ध झाली असल्याची भावना स्कुल च्या प्राचार्या शुभांगी पोहेकर तथा मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक भावना रुजवण्याच्या दृष्टीने उपयुक्त शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून परिसरातील निमंत्रित शाळांनी या शिबिरासाठी विद्यार्थी पाठवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन स्कुल च्या  प्राचार्या शुभांगी पोहेकर यांनी केले आहे.