विज्ञान हा शिकण्याचा नसून जगण्याचा विषय : प्रा.अमीर धमानी

विज्ञान हा शिकण्याचा नसून जगण्याचा विषय : प्रा.अमीर धमानी 


विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान - प्राचार्या शुभांगी पोहेकर


शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता विज्ञान भारती चे विविध कार्यक्रम नागभीड येथे घेण्यार - मनिषा घारे कार्यकारणी सदस्य, वि.भा.प्र.म. नागपूर


नागभीड :: समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर यांच्या मार्गदर्शनात विज्ञान संस्कार शिबिराचे उदघाटन दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाले. डॉ.प्रा.अमीर धम्माणी, प्रा. रजनी चिलबुले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  संस्था सचिव अजय काबरा , विभा च्या सौ मनिषा घारे , डॉ. क्रांती खारकर व विज्ञान क्षेत्रातील तज्ञ मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान हा शिकण्याचा विषय नसून जगण्याचा विषय आहे . दैनंदिन जीवनातील घडामोडीत सकाळपासून रात्री पर्यंत विज्ञानाशिवाय काहीच शक्य नाही असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी केले . विज्ञान भारती आणि ट्विंकल इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान संस्कार शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

डॉ. क्रांती खारकर आणि त्यांच्या चमुने रेबीज बद्दल जनजागृती केली पाळीव प्राणी व जंगली प्राणी यां बदल मौलाचे मार्गदर्शन केले बरोबर च डॉ. खारकर यांच्या चमुने श्वान बाबद जनजागृती करीत प्रत्यक्ष डेमो देऊन पाळीव श्वान व मोकाट श्वान या बदल माहिती दिली आणि श्वानाने चावा घेतल्यास रेबीज पासून बचवा साठी योग्य उचार कसा घ्यावा या बद्दल माहिती दिली. 

विज्ञान भारती ने प्रथमच ग्रामीण भागात विज्ञान संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे . या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता विज्ञान भारती चे विविध कार्यक्रम नागभीड येथे घेण्याचा मानस विभा च्या कार्यकारणी सदस्य मनिषा घारे यांनी बोलून दाखविला. दरम्यान प्रा. शुभांगी पोहेकर, प्रा. रजनी चिलबुले यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थांना मार्गदर्शन केले व आपल्या जीवनातील अनुभव व्यक्त केले .

 विज्ञान संस्कार शिबीर मध्ये सर्व विद्यार्थी रमले होते. या शिबिरात तालुक्यातील अनेक शाळेतील 7वी ते 9वी च्या  विद्यार्थांचा सहभाग होता. विज्ञान गीताने कार्यक्रमांची सांगता झाली.