डिजिटल मिडिया पत्रकार संघ कोरपना तर्फे महाराजांचा सत्कार...
कोरपना | रोशन आस्वले (ता. प्र.) : कोरपना तालुक्यातील वनसडी येथे दिनांक 12/04/2025 ते 19/04/2025 पर्यंत श्रीमद भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला होता सदर सप्ताहामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते .सकाळी रामधून पासून सुरुवात होऊन सायंकाळी भजन , कीर्तनाचे आयोजन करण्यात येत होते .हा सप्ताह भागवताचार्य ईश्वर वांजरीकर यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाला..
याचेच औचित्य साधुन डिजिटल मिडिया पत्रकार संघ कोरपना तर्फे सर्व महाराज मंडळीचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार कार्यात भागवताचार्य ईश्वर वांजरिकर महाराज , भुसारी महाराज , सुधाकर कावडकर महाराज , भोयर महाराज , मोहितकर महाराज , धाबेकर महाराज , वनसडीचे उपसरपंच इरफान शेख , विठ्ठल राठोड , डॉ. कवडू पिंपळकर, रोशन आस्वले, विजय आंबेकर, भारत रागीट, विठोबा पिंपळकर, अमर विंचू, दत्तु उरकुडे तथा वनसडी वासिय जनता जनार्दन मोठ्या संख्येने उपस्थित होते.