Top News

Plantation of trees in Amrit Garden by Guardian Minister Sudhir Mungantiwar....

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ हे मूल तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्रातील तीर्थयात्रा व विविध पर्यटन स्थळांच्या दर्शना करीता रवाना.....




 विदर्भ माझा न्युज 24 - मुल 


        मूल तालुक्यातील  येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून व सदर निवडणुकांची रणधुमाळी सुरु करण्यापूर्वी  देव - देवतांचे आशीर्वाद घेण्याकरिता माहूर देवी, शेगाव चे गजानन महाराज , शिर्डीचे साईबाबा , शनी शिंगणापूर  इत्यादी पवित्र स्थानाचे दर्शन  घेण्याकरीता मूल तालुक्यातून  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी  निघाले आहेत ! 



        येणाऱ्या निवडणुकीत घव - घवीत यश संपादन करीता  देव-देवतांचे आशीर्वाद घेऊन येणाऱ्या निवडणुकीत अतिशय स्फूर्तीने  विरोधकाला लढा देण्याकरिता  व घाम फोडण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यात जोश व ऊर्जा तयार व्हावी ह्या उद्देशाने काल दिनांक २५-०८-०२३ रोजी शुक्रवारला  रात्री 9 .00 वाजता मूल तालुक्यातील  बहुसंख्य पदाधिकारी महाराष्ट्र महादर्शन यात्रे करिता रवाना झाले !


महाराष्ट्र दर्शन यात्रे चा लाभ मिळण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ ह्यांनी स्वतः संपूर्ण स्वखर्चाची जवाबदारी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांना देवदर्शन व पश्चिम महाराष्ट्रतील कृषीउद्योग , राहुरी विद्यापीठ व विविध पर्यटन स्थळे  बघण्याचा  व आनंदाचा लाभ मिळवून देण्याचा विशेष प्रयत्न  केलेला आहे ! 



      ह्यामध्ये ग्रामीण भागातून गाव प्रमुख ,  शहरातून वार्ड प्रमुख  व कार्यकारणी ह्याप्रमाणे सदर सहली मध्ये  बहुसंख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे !

     

Previous Post Next Post