विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच देशाच्या प्रगतीचे खरे लक्षण - नारायण जी हिवरकर
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
दिनांक 15 ऑगस्ट 2023 ला जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे स्वातंत्र्य दिनाचा औचित्याने, डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम इंनोव्हेटिव्ह विज्ञान प्रयोगशाळा, व इयत्ता 5 वी आणि 8 वी सेमिइंग्रजी वर्गाचे उदघाटन तसेच मेरी मिट्टी , मेरा देश याअंतर्गत शिलालेखा चा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नारायण जी हिवरकर, उद्घाटक म्हणून. सुरेखाताई नवले सरपंच कन्हाळगाव, प्रमुख अतिथी स्थानी विनोद नवले उपसरपंच , मुख्याध्यापक स्वतंत्रकुमार शुक्ला, माझी सैनिक वासेकर, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती चे विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शीलालेखाचे अनावरण सुरेखाताई नवले सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच शासन पुरस्कृत डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम इंनोव्हेटिव्ह विज्ञान प्रयोगशाळा याचे उद्घाटन, कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण जी हिवरकर यांचा हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व भारतीय माझी सैनिक वासेकर यांचा शाल - श्रीफळ - पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इयत्ता 5 वी आणि 8 वी सेमिइंग्रजी वर्गाचे रीतसर उदघाटन करून सरपंच - उपसरपंच व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुस्तके प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वतंत्र कुमार शुक्ला यांनी , उद्घाटनिय भाषण सुरेखाताई नवले यांनी, तर अध्यक्षीय भाषण नारायण जी हिवरकर यांनी केले. त्यात त्यांनी शाळेची विशेष आणि उल्लेखनीय प्रगती बद्दल स्तुती केली, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच देशाच्या प्रगतीचे खरे लक्षण असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रफुल जीवने यांनी तर आभारप्रदर्शन. संजय डोए यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी . विठ्ठल मडावी , सुरज जुनघरी, प्रियांका भगत, रोहिणी आडे, . अफसाना अली, संजय मनवर, ताराबाई मेश्राम इत्यादींनी सहकार्य केले.

