Top News

Public benefit demand of MLA Pratibha Dhanorkar....give financial assistance to tiger reserve employees during closure....

आमदार प्रतिभा धानोरकर यांची लोक हितकारी मागणी....बंद काळात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांना आर्थिक साहाय्य द्या....




 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 


ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील कोरझोन मध्ये काम करणाऱ्या गाईड व ड्रायव्हर यांना व्याघ्र प्रकल्पाच्या पावसाळी बंद काळात आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

        ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी जग प्रसिद्ध आहे. देश अंतर्गत व देशा बाहेरील पर्यटक पर्यटनासाठी येत असतात त्यांना मार्गदर्शन ड्रायव्हर चा माध्यमातून उत्कृष्ठ पर्यटनाची संधी प्राप्त करून दिली जाते. 

त्याचसोबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची संपूर्ण माहिती पर्यटकांना दिली जाते. परंतु दरवर्षी पावसाळ्यात तीन महिने कोरझोन मधील पर्यटन बंद असल्याने रोजगार चालणाऱ्या ड्रायव्हर व गाईड यांना त्याकाळातील मानधन मिळत नाही. 

म्हणून कोर क्षेत्रात काम करणाऱ्या गाइड व वाहन चालक यांना किमान अर्थसाह्य देऊन सहकार्य करावे अशी लोक हितकारी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.


         

Previous Post Next Post