Top News

A person who went for a morning walk was attacked by a bear.

पहाटे फिरायला गेलेल्या व्यक्तीवर अस्वलीचा हल्ला....

 


 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 

शहरात अस्वलिने प्रवेश केले असून पहाटे फिरायला गेले असतांना प्रेमदास मारोती रामटेके यांच्यावर अस्वलिने हल्ला केल्याने प्रेयदास रामटेके सदर हल्यात गंभीर जखमी झाल्राची घटना आज सकाळी घडली‌ आहे.

सवीस्तर वृत्त असे आहे की चंद्रपूर शहरात अस्वलीने प्रवेश केला असून सदर अस्वलीने पहाटे फीरायला गेलेल्या प्रेमदास रामटेके यांच्य वर हल्ला केला असुन या हल्यात प्रमदास गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रग्णालयात उपचार सुरू आहे. हिंसक वन्य प्राणी तसेच अस्वल या सारख्या वन्यप्राण्यांचे शहरात ये-जा होत असल्याने या भागातील परिसरात दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज दिनांक शुकरवार 7 जुलै चा पहाटे 5 वाजताच्या सुमारास छत्रपती नगर येथील रहिवासी असलेले प्रेमदास रामटेके विद्या विहार कॉन्व्हेन्ट परिसरात फिरायला गेले असताना त्यावेळी झुडपात लपून बसलेल्या अस्वलीने त्यांचावर हल्ला केला. या हल्यात प्रेमदास गंभीर रीत्या जखमी झाले आहे.

अस्वलिने एका इसमावर हल्ला केला बघुन त्या परिसरात फिरत असलेल्या नागरीकांनी अस्वली च्या दिशेने धाव घेतली, धाव घेतलेल्या लोकांना बघुन अस्वल तिथून पळून गेली. गंभीर अवस्थेत प्रेमदास रामटेके यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले असताना, उपचार दरम्यान त्यांचा डोक्याला व शरीराला मिळून असे जवळपास 24-25 टाके लागले. सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन कर्मचारी अस्वली चा शोध घेत आहे.

Previous Post Next Post