Top News

Big news: Another big earthquake in state politics....... Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister..... NCP gets 9 minister posts in Shinde-Fadnavis government These leaders took the ministerial oath 👇🏻

मोठी बातमी : राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भुकंप.......


अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.....


शिंदे-फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस ला ९ मंत्रीपद


या नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ 👇🏻



 विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 

अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथघेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप केला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार त्यांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्री झाले आहेत. त्यांची नावे देखील समोर आली आहेत.

नावे खालील प्रमाणे - १) अजित पवार २) छगन भुजबळ ३) दिलीप वळसे पाटील ४) हसन मुश्रिफ ५) धनंजय मुंडे ६)धर्मरावबाबा आत्राम ७) आदिती तटकरे ८) संजय बनसोडे ९) अनिल पाटील

Previous Post Next Post