बल्हारशाह शहरातील प्रभाग क्र. ०१ व ०२ येथील मोठ्या नाल्यांची Returning wall तसेच नाल्याची टुटलेेली Chambers ची दुरस्ती करण्यात यावी. - भाजयुमो
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील प्र .क्र. ०१ व ०२ येथील डॉ राजेंद्र प्रसाद व पंडित दीनदयाल वॉर्ड या दोन्ही वार्डाच्या मधोमध मोठा नाला आहे. पावसाळ्यामध्ये संततधार पावसाने हा नाला कचरा व दुर्गंधीने पुलावरून ओसाळत वाहत जातो या पुलाला Returning Wall नसल्यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच येथे दुर्घटना होण्याची तीव्र शक्यता आहे. तसेेच प्र .क्र .०२ डॉ राजेंद्र प्रसाद वार्ड व कन्नमवार वार्ड येथील काही नाल्यांची chambers टुटलेेली व काहींना chambers सुध्दा नाहीत यामुळे येथे पण दुर्घटना होण्याची तीव्र शक्यता आहे. त्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांनी मुख्याधिकारी न. प. बल्हारशाह यांना निवेदन देऊन या विषयाचा गांभीर्य बघून लवकरात लवकर chambers दुरूस्ती व Returning wall बनवून देण्यात यावी ही विनंती केली या वेळी दर्शन मोरे, सुरज चौबे, लखन बानोत, धनसिंग पटेल, आकाश शर्मा, गोलू घुगरे हे उपस्थीत होते!

