Top News

A school student ended his journey by consuming poison.

विष प्राशन करून शाळकरी विद्यार्थ्याने संपवीली जिवन यात्रा.......




विदर्भ माझा न्युज 24 - भद्रावती 

 विष प्राशन करून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना दि. १० जुलै २०२३ रोजी सोमवारी मध्यरात्री तालुक्यातील घोडपेठ येथे घडली.

साहिल सुनील ठक (वय १६) रा. घोडपेठ असे मृतकाचे नाव असून चांदा आयुध निर्माणी वसाहतीतील केंद्रीय विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. मृतक साहिल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवाशी होता. तो घोडपेठ येथील आपल्या मामा कळे राहून शिक्षण घेत होता. साहिल याने घटनेच्या मध्यरात्री विष प्राशन केले व स्लाॅप वर गेला. तेथेच त्याचा मृत्यू झाला.

सदर घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली. तो स्लॅपवर मृतावस्थेत आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमधे लिहले असल्याचे पोलिसांनी सांगितले. भद्रावती पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post Next Post