विदर्भ माझा न्युज 24 - नागभिड
नागभिड पोलिस स्टेशन चा कार्यभार सांभाळताच पोलिस निरीक्षक योगेश घारे हे ॲक्षन मोड वर पहायला मिळत आहेत,शहरातील अवैद्य धंद्यांनवर अंकुश लावण्याचे काम पोलिस निरीक्षक योगेश घारे करत असल्याने अवैद्य धंदे करणार्यांचे चांगलेच धाबे दनांदले आहे.
नागभिड शहरातील टिपांईट जवळ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फील्मी स्टाईल ने नाका बंदी करीत सिंल बंद डब्यासहित अंदाजे एकून 1लाख 32 हजार रुपयाचा सुगंधीत तंबाखू ,6 लाखाची फोरव्हिलर गाडी ,30 हजार रुपए किंमतीचे 4 नग. मोबाईल असा एकुन 762,000 रू चा मुद्दे माल जप्त करण्यात आले आहे.
सदर कार्यवाई मध्ये 5 आरोपीनां अटक करण्यात आली असुन,गाडी क्रमांक एम एच 34 सि,पी 2624 असुन ती भंडारा वरुण चंद्रपुर कडे जात असतांना गुप्त माहितीच्या आधारे फिल्मी स्टाईल नाकाबंदी करुण पकडण्यात आले आहे.
सदर ची कार्यवाई पोलिस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक साखरे, पोलीस अंमलदार कृणाल पतरंगे, रोहित तुमसरे,गोकुल कुसराम यांनी केली आहे.
जवळपास एक महिण्याच्या कालावधीत पोलिस निरीक्षक पदाची जवाबदारी घेवून योगेश घारे यांनी अनेक अवैद्य धंद्यांना अंकूश घातले,शहरात राञो गस्त चालु असल्याने चोरीचे व चिडीमार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत परीसरात अवैध जुगार, सट्टा पट्टी,दारु,कोबंड बाजार,असे अनेक मार्गानी अवैध धंद्याना ऊत आले होते,आता ते सुद्या बंद होण्याच्या मार्गावर? असल्याची शक्यता आता नाकारता येत नाही.