बल्हारशाह शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नगर परीषद करणार तरी कधी?
मोकाट कुत्र्याचा 6 वर्षीय चीमुकलीवर जोरदार हल्ला......
आराध्याच्या गालावर १९ टाक्यांची शस्त्रक्रिया.......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील वस्ती वीभागात सर्वोदय विद्यालया शेजारील मुरलीधर मंदिराजवळ आराध्या आशिष मानकर वय ६ वर्षे, रा. गांधी वाॅर्ड ही चिमुकली खेळत असतांना एका मोकाट कुत्र्याने तिच्या वर हल्लाकरीत गालाला जोरदार चावा घेतला. यात गाल चांगलाच फाटला गेला. #vidarbhmazanews24
सदर घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा कुत्रा पिसाळलेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुलीचे वडील आशिष मानकर हे मिस्त्री काम करतात. #vidarbhmazanews24
घटनेनंतर कुटुंबीयांनी आराध्याला लगेच स्थानीक शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवीन्यात आले. डॉक्टरांकडून तिच्या गालावर तब्बल १९ टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. #vidarbhmazanews24
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच नागरीकांचे म्हने आहे.शहरात मोठ्या प्रमानात मोकाट कुत्रे वाढली असून त्यांचा कडे नगर परीषदेचे दुर्लक्ष आहे. मात्र या घटने नंतर आता नागरीकांनी शहरातील मोकाट कुत्रांचा बंदोबस्त करावा म्हणून नगर परीषद च्या मुख्याधिकार्यांना निवेदन दिले आहे. #vidarbhmazanews24
