Top News

Breaking News__In Balharshah city, two youths committed suicide by hanging themselves at different speeds....

Breaking News_बल्हारशाह शहरात दोन‌ युवकांची वेग वेगळ्या ठीकानी गळफास घेऊन आत्महत्या......


बल्हारशाह येथील विसर्जन घाट परिसरात गळफास घेवून वेकोलि कर्मचाऱ्यांची तर शहरातील स्थानिक मौलाना आझाद वॉर्ड परिसरात राहते घरीच एका युवकाची आत्महत्या.......



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह शहर आज 2 तरुणाच्या आत्महत्यांनी सुन्न झालंय, बल्हारशाह शहरातील विसर्जन घाट परिसरात आज सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास एका अनोळखी इसमाने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या संदर्भातील अधिक माहितीनुसार बल्हारशाह शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड येथील निवासी असलेले प्रशांत मनोहर पिंपळशेंडे, वय - 30 वर्षे हे वेकोली मध्ये कार्यरत असून आज सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास बल्हारशाह शहरातील विसर्जन घाट परिसरात संपवेल क्वार्टरच्या लगत एका वृक्षाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या मृतदेह आढळून आला.



सदर इसमाने निळ्या रंगाचा पॅन्ट व फीकट गुलाबी रंगाची जर्शी परिधान केल्याचे दिसून येत आहे. सदर इसमाने आत्महत्या का केली याच अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र या संदर्भाचा पुढील तपास  उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्हारशाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद रासकर करीत असून सदर व्यक्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय बल्हारशाह येथे पाठविण्यात आला आहे. तर पोलीस विभागा आपली कार्यवाही पुर्ण करीत नाही तोच बल्हारशाह शहरातील स्थानिक मौलाना आझाद वॉर्ड परिसरात निवासी असलेला अर्जुन रामलखन निषाद वय - 26 वर्षे यांनी आपले राहते घरी कुणीच नसल्याची संधी साधत दुपारी 12:00 वाजताच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडास आली.

विशेष म्हणजे सदर युवक हा आजच सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांना आपल्या घरासमोर फिरताना नागरिकांना दिसून आला होता. या संदर्भात सूत्राद्वारे मिळालेल्या माहीती नुसार सदर युवकाने बेरोजगारीने आर्थिक तंगीमुळे आत्महत्या केली असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे मात्र पोलीस तपासात सत्य काय ते समोर येईलच सदर घटनेची माहीती पोलिसांना कळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाली व तरुणाच्या गळफास सैल करून तरुणावर काही उपचार होऊ शकेल का या उद्देशाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर युवकाला मृत घोषित केले. या संबंधी पोलीस तपास सुरु असून उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येइल मात्र बल्हारशाह शहरात आज 2 तरुण युवकाच्या गळफास घेवून आत्महत्यांच्या घटना घडल्यामुळे जनमाणसात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post Next Post