Top News

Savli Sadoba (Circle) has become the home of illegal sand smugglers.....

सावळी सदोबा(सर्कल) बनले अवैध रेती तस्करांचे माहेरघर.....


महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडुन अवैध रेती संदर्भात अर्थपूर्ण विराम.........


विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 


 आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा हा ग्रामीण परिसर अवैध रेती तस्करीच्या विषयात नेहमीच चर्चेत आहे,मागील काही दिवसांमध्ये या परिसराला रेती तस्करांचे माहेरघर म्हणून सुद्धा एक नविन ओळख निर्माण झालेली आहेत,झटपट पैसे कमवण्याचा व्यवसाय म्हणून अवैध रेती तस्करी व्यवसायाकडे पाहल्या जात आहे,या व्यवसायामध्ये अनेक पांढरपेशी राजकीय नेते उतरल्याने यांना आळा घालने काळाची गरज आहे,मागील अनेक वर्षापासून या परिसरामध्ये अनेक रेती तस्करांचा उदय झालेला असून, रेती तस्करांनी अवैध रेती तस्करीच्या भरोशावर खूप मोठ्या प्रमाणात मोह-माया जमवली आहेत,त्यामुळे या परिसरामध्ये अवैध रेती तस्करी करणाऱ्यांची एवढी हिंमत वाढलेली आहे,या जमवलेल्या मोहमायेच्या भरोशावर या रेती तस्करांनी या परिसरातील अनेक पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा बळी घेतलेला आहे.

मागील काही दिवसांमध्ये याच परिसरातून एका रेती तस्करांने पोलीस कर्मचाऱ्याला रेती तस्करीच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण करताना एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला असताना या अधिकाऱ्याला या प्रकरणामुळे घरी जावे लागेल,जणु काही या परिसरावर रेती तस्करांचे राज्य असल्यासारखे रेती तस्कर परिसरामध्ये वागताना दिसतात,पोलीस कर्मचारी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना विकत  घेतले असल्याचे काही रेती तस्कराकडून नेहमी बोलले जात आहे,आमचं कोणीच काही करत नाही,आमचे हात खूप मोठे आहेत,पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांच्या नाकावर टिचून रेती तस्कर खुलेआम रेती तस्करी करत असल्याचे चित्र सध्या या परिसरामध्ये पाहायला मिळतात,रेती तस्करीच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सावळी सदोबा परीसरातील अवैध रेती तस्करामध्ये अनेकदा वाद-विवाद होऊन अनेक प्रकरणे न्यायालयात गेले आहेत.

या अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर खाली येऊन एका ट्रॅक्टर मजुराचा बळी पण गेलेला असतांना,आर्थिक देवाण घेवानीतुण हा प्रकरण दडपविण्यात आले,अशा अनेक घटना या परिसरामध्ये घडत असतात,पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहे,विशेषता या अवैध रेती तस्करी करणाऱ्या तस्करांना परिसरातील एका मोठ्या राजकीय नेत्याचं पाठबळ असल्याचे समाजबांधांन मध्ये बोलले जात आहे.

Previous Post Next Post