अखेर त्या व्येक्तीला शोधन्यास वन विभागाला तीन दिवसांनी आले यश......
जंगलात हरवलेल्या मनोरूग्न व्यक्तीला संतोष थीपेंनी नेमलेल्या पक्षकाने अखेर सुखरूप आनले शोधून......
विदर्भ माझा न्युज 24 - मोहूर्ली
मोहूर्ली वनपरिक्षेत्र मध्ये दिनाक 31/12/2022 रोजी अचानक घरातून निघून जाऊन वनांमध्ये शिरलेल्या श्री.राजेश चरण दास मेश्राम रा.मोहूर्ली वय 48 वर्ष या मानसिक अवस्था ठीक नसलेली व्यक्ती दिनांक 31 डिसेंबर रोजी पर्यटक यांना जंगलात दिसले असता सदर माहीती मोहूर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना दिली असता त्यांनी लगेच पथक नेमून मनोरूग्न इसमाचा शोध घेणे सुरू केले असता सदर इसम सायंकाळी 6 वाजता च्या दरम्यान दिसून आला त्याच्या जवळ गेले असता सादर इसम जंगलात पळून जात होता,2 दिवसापासून सतत सदर इसम दिसत होता परंतु वनकर्मचारी दिसले की पळून जात होता, शेवटी चारही बाजूने घेराव करून सदर व्यक्तीला पकडून कुटुंब कडे सोपविण्यात आले,सदर व्यक्ती सुखरूप असून प्रकृती चांगली आहे.
हरवलेली व्यक्ती सापडली असल्याने 3 दिवसापासून सुरू असलेल्या मोहिमेला यश प्राप्त झाले असून 3 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजता व्यक्तीला शोधन्यास यश प्राप्त झाले स्थानिक नागरीकांन कडुण वनविभागाचे आभार मानले जात आहे...
शोध मोहीम मोहूर्ली बफर झोन चे वनपरीक्षेत्र अधीकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली वनपालसंजय जुमडे,वनरक्षक सुरेंद्र मंगाम,वनरक्षक आकाश राठोड,वनरक्षक विखुल जनबंधु आणि वनमजूर यांना मदत म्हणून पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर, राजू दशरथ ढवळे यांचे सहकार्य लाभून पथकाने पार पाडले.
दिवसरात्र मोहीम राबवून हरवलेल्या व्यक्तीला शोधून काढल्याने वनविभागास मोठे यश मिळाले कारण सदर परिसरात मोठया प्रमाणात वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांचे अस्तित्व असून' देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय आला आणि देवाची भूमिका वनविभागाने पार पाडल्याने वनविभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
