झरी इथील रस्ता दुतर्फा असलेल्या नाल्याचे काम बोगस?...स्थानीक नागरीकांचे मत......
विदर्भ माझा न्युज 24 - झरी - जामनी
मुकुटबन ते पांढरकवडा या रोड चे काम चालू असुन सदर रोड झरी इथून जात आहे. रोड गावातूनच जात असल्याने नाल्याचे बांधकाम अति तेज गतीने चालू आहे.
नाल्याचे काम इतक्या जलद गतीने चालू आहे कि त्या बांधकामाला पाणी मारायला सुद्धा त्या ठेकेदाराला वेळ नाही.नागरीकांनी वारंमवार सांगून सुद्धा पाणी मारायला सदर ठेकेदार तयार नाहीत. जर बांधकामाला पाणी नाही मारले तर नाल्या लवकर च मोडकळीला येईल हे मात्र नाकारता येत नाही तरी या गोष्टी कळे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अशी स्थानीक नागरिकांची मागणी आहे.

