साखरीत अवैध दारू विक्री विरोधात गावकरी आक्रमक
युवानेते अंकुश गोरे यांच्या नेतृत्वात शेकडो महिला आणि युवकांच्या मदतीने दारू विक्रेत्यास चपराक
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
दि 13-12-2022 राजुरा तालुक्यातील साखरी येथे युवानेते अंकुश गोरे यांच्या नेतृत्वात शेकळो महिला आणि युवकांनी बैठक घेऊन गावात चालू असलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात एल्गार पुकारला.
गावात दारूबंदी झालीस पाहिजे अश्या मागणीसह महिलांनी गावातील युवकांना प्रतिसाद देत दारू विक्रते सतीश वांढरे यांची दारू रंगे हाथ पकडून त्याची संपूर्ण दारू नष्ट करण्यात आली.
गावात चालू असलेल्या या दारूमुळे अनेक कुटुंब त्रस्त असून शेवट युवा नेते अंकुश गोरे यांना पुढाकार घेऊन समस्त युवावर्ग आणि महिलांच्या मदतीने हा एल्गार पुकारावा लागला.
समोर पण अश्याप्रकारची साथ असल्यास गावहितासाठी नेहमी लढण्याची भूमिका अंकुश गोरे यांनी या बैठकीत मांडली.
याप्रसंगी सचिन निमकर, घनश्याम नळे, प्रवीण मोरे,अमोल अडबाले, अक्षय करमणकर, शुभम टिपले, अंकुश अडबाले, चेतन थिपे,अमित निमकर ,शुभम काटवले, प्रज्योत कुडवेकर,सुनिल नगराडे, रितेश त्रिशूलवार,अर्चना आत्रम, रुंदा बोबडे, विना काटवले,शोभा कावले आणि शेकडो युवक आणि महिला उपस्थित होत्या.




