काम त्वरीत पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना मुर्ती शाखा प्रमुख सुरज नकोलवार यांनी दिला आहे......
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
मौज. मूर्ती तहसील राजुरा येथील शिवाजी वार्ड क्रमांक १ मधील पाण्याचा निचरा करण्याकरिता शासनामार्फत नालीची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु सदर नालीचे ग्रामपंचायत मूर्ती मार्फत कोणतीही साफ सफाई करण्यात येत नसून सदर नालीमध्ये प्लास्टिकच्या बाटला प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे.
त्यामुळे नालीचे पाणी वाहण्यास अडथळे निर्माण होत असून पाण्याचा निचरा होणे बंद झाले आहे.
वारंवार ग्रामपंचायत मूर्तीला अर्ज देऊन सुद्धा सदर नालीचे साप सफाई करण्यात येत नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून परिसरातील लोकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. गावात डेंगू रोग मोठ्या प्रमाणात पसरत असून गावात आतापर्यंत पाच ते सहा डेंगूचे रुग्ण आढळून आले आहे. सदर नालीचे सफाई न केल्यास भविष्यात डेंगु मलेरीया ने नागरीक ग्रस्त होऊन रुग्णांचे प्रमाण वाढून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच ग्रामपंचायत वारंवार अर्ज देऊन सुद्धा सदर नाली साफसफाई चे काम करीत नसल्यामुळे भविष्यात होणाऱ्या संपूर्ण जीवितहानीचे व इतर समस्यांचे जबाबदार ग्रामपंचायत व प्रशासन राहील असे निवेदन संवर्धन विकास अधीकारी पंचायत समीती राजुरा यांना शिवसेना शाखा मुर्ती तर्फे देण्यात आले आहे.
निवेदनाची दखल घेऊन कारवाही करून सदर नालीचे साफ सफाई करण्याचे ग्रामपंचायत ला आदेश देण्यात यावे तात्काळ पुर्ण नालीचे काम न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना शाखा मूर्ती प्रमुख सुरज नकोलवार व शिवाजी वार्ड नंबर एक मधील सर्व नागरिकांनी दीले आहे.

