राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत अमन करमनकर यांची निवड
विदर्भ माझा न्युज 24 -राजुरा
मनात जिद्द व आत्मविश्वास असला का यश हे हमखास मिळत असते असेच जिद्द व आत्मविश्वास यांच्या भरोशावर बामनवाडा येथील अमन करमणकर यांची चंद्रपूर येथून राष्ट्रीय रस्सी खेच स्पर्धेत निवड झाली आहे.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अमनने सरावासाठी बाहेर कुठेही प्रवेश घेऊन सर्व केला नाही त्याच्यात असलेला आत्मविश्वास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता घरीच सर्व करणे हे त्याचे नेहमीचे. गावात सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या अमन ने जिल्हास्तरावर रस्सी खेच स्पर्धेत सहभाग घेतला व त्यात त्याचे महाराष्ट्राच्या रस्सी खेच टीम मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली.
या ३१ तारखेला हरियाणा येथील कुरुक्षेत्र येथे रस्सी खेच स्पर्धेचे आयोजन केले असून या ठिकाणी महाराष्ट्र संघाकडून अमन खेळणार आहे. त्याच्या निवडीचे मित्र परिवार व बामनवाडा, चुनाळा येथील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

