Top News

Ruchita Sanjiv Ambekar and Selection of Vidya Subhash Tamkhane for the Inter-University Kabaddi Tournament to be held at Amravati.

कु.रुचिता संजिव आंबेकर व कु. विद्या सुभाष तामखाने यांची अमरावती येथे होणार्या आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेकरीता निवड......... 


राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय,विसापुर येथील खेळाडुंची निवड........


प्राचार्य डाॅ.दिलीप टिकराम जयस्वाल महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा.शालीनी आंबटकर सह इतर शिक्षकांने केले अभिनंदन...........



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

        पच्छीम विभागीय आंतर विद्यापिठ कबड्डी (मुली) स्पर्धा हि दिनांक ०७ ते ११ नोव्हेंबर २०२२ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ,अमरावती येथे होणार्या स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता गोंडवाना विद्यापिठ,गडचिरोली येथील कबड्डी (मुली)चा संघ नुकताच जाहिर झाला आहे‌.

सदर गोंडवाना विद्यापिठाच्या कबड्डी संघात राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय,विसापुर येथील कु.रुचिता संजिव आंबेकर,बी.पी.एड् व्दितीय वर्ष व‌ विद्या सुभाष तामखाने बी.पी.एड् प्रथम वर्ष या मुलींची निवड झाली आहे. 

गोंडवाना विद्यापिठ,गडचिरोली  कबड्डी (मुली) चा संघात निवड   झालेली आहे. सत्र २०२१-२०२२ मध्ये स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ नांदेड येथे कु. रूचिता संजिव आंबेकर हीने आपल्या खेळाचे उत्तम  प्रर्दशन करून‌ तिने‌ आपल्या विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे नाव लौकीक  केले, रुचिता संजिव आंबेकर व विद्या सुभाष तामखाने हिने  आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडिल व तिचे प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांना दिले.  

 या खेळाडुच्या यशाबद्दल राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय,विसापुरचे प्राचार्य डाॅ.दिलीप टिकराम जयस्वाल महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा.शालीनी आंबटकर,विक्की पेटकर,पुर्वा खैरकर आदी प्राध्यापक वृद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Previous Post Next Post