स्थानिक आमदार निधी 25/15 या योजने अंतर्गत गुम्मलकोंडा,ग्रामपंचायतला 15 लाख रूपये मंजूर विकास कामांचे भूमिपूजन भाग्यश्री आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते संपन्न......
विदर्भ माझा न्युज 24 - सिरोंचा
जनतेचा सेवक म्हणून 100% काम करणारे अहेरी मतदारसंघाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे सुपुत्रिका माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे नवनिर्वाचित सिनेट सदस्या भाग्यश्री आत्राम(हलगेकर) यांचा दोन दिवसीय सिरोंचा तालुका दौरा कार्यक्रम दिनांक 14/11/2022 ला होता.
प्रथम गुम्मकोंडा ग्रामपंचायत मध्ये आलेल्या स्थानिक आमदार निधी 25/15 या योजने अंतर्गत मंजूर झालेल्या सि.सि.रोडचा व नाली बांधकाम करणे करिता भाग्यश्री आत्राम(हलगेकर) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, आणि यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी गावकऱ्यांन सोबत चर्चा करतांना असे म्हणाले की गरज पडल्यास स्थानिक आमदार निधीतून अजून निधी खेचुन आणू...यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,न.प.सिरोंचाचे माजी नगरसेवक रवी राल्लाबंडीवार,सरपंच जलमय्या कुरसम,उपसरपंच सम्मय्या कुम्मरी,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.मोडेम सत्यम,प.समितीचे माजी सदस्य शानकोंडा प्रभाकर,वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनय्या मादेशी,युवाकार्यकर्ते व समाजसेवक चेतनराव व्यासमनेनी,जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर मोलगुरी, ग्रा.पंचायतचे सदस्य कार्तिक जनगाम,ठेकेदार श्री.सत्यनारायण चिलकामारी,गावकरी सत्यम लाटकरी,शंकर जिमडे,अरविंद जणगाम,जोडे दिलीप,देवदास लाटकरी,ओमनारायण गोगुला,मोहनदास गोगुला,मोहन कुम्मरी,नागक्का कुम्मरी,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.


