Top News

Ballarshah Gondia passenger train will now stop at Visapur.

बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर गाडी आता विसापूर येथे थांबणार........


विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

विसापूरवासीयांची बहुप्रतीक्षित मागणी आता पूर्ण झाली आहे. बल्लारशाह येथून जवळच्या गोंडवाना विसापूर रेल्वे स्थानकावर ३१ ऑक्टोबरपासून ७८८१९ बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर गाडी थांबण्यास सुरुवात झाली आहे. 

राज्याचे वनमंत्री व चंद्रपुर जिल्ह्याचे चे पालकमंत्री,  सुधीर  मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री  हंसराज अहिर एवं चंद्रपुर जिल्हा भाजपाध्यक्ष  देवराव भोंगले यांच्या नेतृत्वाखाली अजय दुबे मेंबर नेशनल रेलवे बोर्ड NRUCC सतत प्रयत्न करत होते.

या निर्णयाचे बल्लारशाह भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, जिल्हा भाजयुमो उपाध्यक्ष संदीप पोडे, अशोक भोयर, शेखर गिरडकर व समस्त विसापूर वासियांनी स्वागत केले आहे.

Previous Post Next Post