बल्हारशाह पोलिसांची धडक कारवाई अंदाजे 10 ते 15 आरोपींना अटक......5 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील सातनल चौक पोलिस चौकी क्र.1 च्या समोर श्रीराम वार्डातील रणदिवे यांच्या घरी बल्हारशाह पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धाड मारली असता त्याठिकाणी लाखोंचा जुगार सुरू होता.
या प्रकरणात अंदाजे 10 ते 15 आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे. दि. 31 ऑक्टोंबरला रात्री 8:00 च्या दरम्यान गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की श्रीराम वार्डात एकाच्या घरी लाखोंचा जुगार भरला असून त्या ठिकाणी काही नामवंत 52 पत्त्यांचा जुगार खेळत होते. बल्हारशाह पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख विकास गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस टीमने फिल्मी स्टाईलने रणदिवे यांच्या घरी धाड मारली.
तिथे जवळपास 5 लाख च्या वरील रुपयांची रोख रक्कम व नामवंत आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
