Top News

सुभाष नगर येथे जातीय सलोखा व शांतता बैठक संपन्न......

सुभाष नगर येथे जातीय सलोखा व शांतता बैठक संपन्न......



 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी  



आर्णी तालुक्यातील असलेल्या सावळी सदोबा सर्कल मधील मौजा सुभाष नगर येथे शांतता बैठकाच्या आयोजन करण्यात आली होती, सदर कार्यक्रमाला आवर्जून पारवा पोलीस स्टेशनचे  ठाणेदार विनोद चव्हाण , पोलीस दूरक्षेत्र सावळी सदोबा  येथील ठाणेदार गजानन गजभारे यांच्या मार्गदर्शनामध्ये जातीय सलोखा व शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,या बैठकीला गावातील महिला मंडळ व पुरुष मंडळ  सर्वच आजी-माजी सर्वच गावातील धनसिंग राठोड शिक्षक, यांनी मार्गदर्शन दिले. 

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बारभाई येथील पोलीस पाटील अविनाश राठोड व तंटामुक्ती अध्यक्ष रमेश राठोड जातीय सलोखा व शांतता बैठकीला ठाणेदार यांनी मार्गदर्शन करताना,सर्वप्रथम आपल्या कार्यकाळात गुन्ह्याची व कार्यवाही संपूर्ण माहिती देण्यात आली, अवैद्य दारू जुगार व इतर अवैध धंद्यावर आपण यापुढे कठोर कारवाई करणार असल्याचे सांगून अपुऱ्या पोलीस मनुष्यबळामुळे सर्वसामान्य लोकांनी पण पोलीस प्रशासनाला मदत करावी अशी मागणी यावेळी ठाणेदारांनी केली यावेळी बैठकीला असलेल्या गावातील नागरिक नेतृत्वामध्ये समाविष्ट झाले तर आज अवैध दारू,जुगारामुळे मुक्त झाल्याने,

 गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था असल्यामुळे भांडणाचे प्रमाण कमी झाले आहे,आपण सर्वांचे सहकार्य असेच राहू द्या,अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवणार,असून गुन्हेगारांवर यापुढेही कठोर कारवाई होणार ठाणेदार चव्हाण यांनी संगीतले,

सदर शांतता बैठकीला उपस्थित सौ, सोनाली सुनील राठोड ,(सरपंच ) पुनाजी जाधव, अविनाश राठोड, मारोती गेडाम, प्रदीप कनाके ,पुंडलिक राठोड, प्रेमदास राठोड , काशिराम पवार,निर्दोष राठोड खुशाल जाधव ,गजानन राठोड ,विठ्ठल राठोड, रोहिदास राठोड ,कृष्णा चव्हाण, विजय जाधव ,सुरेश राठोड ,कुलेश जाधव, अशी अनेक गावातील तरुण मंडळी जेष्ठ नागरिक व महिला मंडळ सर्व समाज बांधवांनी आपल्या या कार्यक्रमात  बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post