राजुरा तालुक्यातील हिरापूर येथे शेतशिवारात वीज पडून बैलाचा मृत्यू.......शेतकऱ्याचे यात मोठे नुकसान.......
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील हिरापूर येथे आज दुपारी 2.30 वाजता विजेच्या कडकडाट सह खूप जोरदार पाऊस झाला .हिरापूर येथील शेतकरी सचिन घटे यांचा माणूस शेतामध्ये बैल चारत होते अचानक पने पावसाने हजेरी लावली .पाऊस मोठा जोरात आणि विजेचा गडगडाट होता त्यामुळे वीज ही बैल चरत असतानी बैलाच्या अंगावर पडली बैल जागीच मरण पावला.आणि दुर्दैवाने एक बैल बचावला .
सचिन घटे यांच्या धुरचा बैल गेल्याने त्यांच्यावर खूप मोठे आर्थिक संकट कोसळले.पंचनामा करण्यात आला असून उपस्थित ,हिरापूर येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.सचिन घटे याना शासनाने मदत करावी अशी ग्रामस्थां कडून विनंती करण्यात आली.

