Top News

Now the question about security in Balharshah city?

बल्हारशाह शहरात आता सुरक्षते बद्दल प्रशन चीन्ह?...नागरीकांन मध्ये चर्चेला उधान.....


मॉर्निग वॉकला जाने ही ठरत आहे धोक्याचे......


मॉर्निग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन ओढून चोरटे झाले पसार......

 


विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह शहरात दिवाळीचा उत्साह सगळीकडे असतांना आज सकाळी भर वस्तीच्या व वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन ओढून चोरटे पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

याविषयीच्या अधिक माहितीनुसार बल्हारशाह येथील सिद्धार्थ वॉर्डातील राहणारी एक महिला ही नित्यनीयमाने रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायची मात्र आज सकाळी फिरायला गेली असता वस्ती विभागातील गोल पूलीया ते अग्निशमन विभागाच्या कार्यालयाच्या दरम्यान रेल्वे वसाहती कडुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व त्यात असलेल भगवान बुद्धाच लॉकेट ज्याची अंदाजित किंमत ( 30,000/- ) रू असून सदर दागिने गळ्यातून ओढून पसार झाल्याची घटना घडली आहे

 विशेष बाब म्हणजे नगर परिषदेकडून वस्ती विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर सतत वर्दळ असते. शिवाय याच परिसरात ठोक भाजी खरेदी-विक्री होते तसेच 24 तास ऍक्टिव्ह असणार अग्निशमन विभागाचं कार्यालय तसेच 100 अं. मीटर वर पोलिसी स्टेशन असतांना चोरटयांनी महिलेच्या गळ्यातून चोरी करण्याचं धाडस दाखवून पोलिस विभागासमोर एक मोठे आव्हान निर्माण केले आहे. 

यापूर्वी ओसाड परिसर असलेल्या परिसरात वनविभागात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या मात्र ऐन दिवाळीच्या काळात अशा प्रकारची चोरीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.

Previous Post Next Post