Top News

Mahatma Gandhi Jayanti celebrated with great enthusiasm on behalf of BJP Korpana Taluk....

 भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी....



  विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना  

2 आक्टोंबर रोजी भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख उपस्थिती कृष्णा पडोळे, प्रमोद कोडापे माझी सरपंच, विठ्ठल गेडाम,सुनिल ढासले, धर्मा मडावी,संजय वाबीटकर,वासुदेव वाघाडे,राजु येरेकर,सुरेश बांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांचा जन्म 2:10:1869 रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना भारतातून हाकलून लावले व भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहांचा वाटा उचलला असे आपले मनोगत व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी,गावातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजु येरेकर यांनी केले तर आभार विठ्ठल गेडाम यांनी मानले.

Previous Post Next Post