चंद्रपुरचे नवीन पोलिस अधिक्षक म्हणुन रविंद्र सिंग परदेशी यांची नियुक्ती.......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयानुसार ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. यानुसार चंद्रपुर चे पोलिस अधिक्षक डॉ. अरविंद साळवे यांच्या ठिकाणी उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथून श्री रविंद्रसिंग एस. परदेशी जिल्हापोलिस अधिक्षक चंद्रपुर म्हणुन नियुक्ती कऱण्यात आली आहे. तर गडचिरोली येथील तत्कालिन पोलिस अधिक्षक श्री अंकित गोयल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक पदी बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी श्री नीलोत्पल पोलिस उप आयुक्त ब्रह्न्मुंबई यांची गडचिरोली च्या पोलिस अधिक्षक पदी नियुक्ती कऱण्यात आली आहे.

