Top News

विरुर (स्टे), येथील विर मराठा गणेश मंडळ यांनी अनोखा उपक्रम राबवत उघडले माणुसकीच्या भिंतीचे दरवाजे.....

विरुर (स्टे), येथील विर मराठा गणेश मंडळ यांनी अनोखा उपक्रम राबवत उघडले माणुसकीच्या भिंतीचे दरवाजे.....


गावातील एकमेव गणेश मंडळ सलग सहा वर्षा पासुन कार्यरत असुन प्रत्येक वर्षी घेत असतात समाज सेवेचे उपक्रम......




विदर्भ माझा न्युज 24 - विरूर स्टे.


गावातील एकमेव गणेश मंडळ यांनी दिनांक 8/09/2022 गुरुवार रोज सायंकाळी 6 वाजता बसस्टॉप चौक इथे माणुसकीची भिंत उभारण्यात आली, 


गरजू लोकां साठी ज्यांच्या कडे उपयोगात न येणारे कोणतीही वस्तू तिथे द्याची व ज्यांच्या उपयोगात येते त्यांनी  घेऊन जायची  हा अनोखा विचार गावातील नागरिकांना हि फार आवडला असुन अनेक प्रतिसाद पहिल्याच दिवशी मिळाला.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन. पोलिस निरीक्षक  राहुल चव्हाण , सरपंच भाग्यश्री आत्राम, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव पाला, प्रतिष्ठित नागरिक बवेजा जी, वीर मराठा मंडळाचे पदाधिकरी सदस्य , शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर मोरे पाटील , मोतीराम दोबलवार, व शेकडो च्या संख्येनी गावकरी उपस्थित होते.


Previous Post Next Post