चंद्रपुर बायपास मार्गावर टिप्पर पलटी, 4 कामगार जखमी......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
चंद्रपुर बल्हारशाह मार्गावरील बायपास रोड, डॉ आंबेडकर चौका जवळ रेती भरलेला भरधाव टिप्पर पलटी झाला यात 4 कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता घडली आहे.
चंद्रपुर बल्हारशाह मार्गावरील पेट्रोल पंप समोर रेती चा टिप्पर क्र. MH 34 M 2398 चालकाचा तोल गेल्याने भरधाववेगाने येत असलेला हा टीप्पर डीवायडर ला धडक देत पलटी झाला आहे, यात 4 मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.