ॲड.संजय बाजपेयीवर फास्टट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवा - प्रशांत झामरे,अध्यक्ष भारतीय युथ टाइगर्स,बल्हारशाह
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील बाजपेयी कंप्युटर एज्युकेशनचे संचालक ॲड. संजय बाजपेयी या नराधमाने त्याच्या इन्स्टिट्युटमध्ये कंप्युटर शिकायला येणार्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करण्याची, माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले.
या घटनेमुळे बल्हारशाह शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोबतच संजय बाजपेयी हे राजकिय पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे या प्रकरणात राजकिय दबाव असण्याची चर्चा समाजामध्ये सुरू आहे. यामुळे सदर व्यक्तीवर कसलीही गयवय न करता कठोर कारवाई करुन पिडीत मुलीला न्याय मिळन्या करिता सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावा अशी मागणी भारतीय युथ टाइगर्स संघटना बल्हारशाहच्या वतीने करण्यात आली.
त्यासंबधीचे निवेदन भारतीय युथ टाइगर्स संघटना चे संस्थापक व अध्यक्ष प्रशांत झामरे यांच्या नेतृत्वात बल्हारशाह पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश पाटिल व तहसिलदार जगताप यांना देण्यात आले. सोबतच ज्याठिकाणी ही घटना घटली ते कंप्युटर इन्स्टिट्युटही तेथुन कायमचे बंद करण्याची मागणीगण यावेळी करण्यात आली.
सदर निवेदन देण्यासाठी भारतीय युथ टाइगर्स संघटना बल्हारशाह चे संस्थापक व अध्यक्ष प्रशांत झामरे , ॲड. प्रणय काकडे ,स्वामी रायबरम, नागेश रत्नपारखी, हर्मीत सिंग जबल, माही जबल, मिलिंद गेडाम, हुसैन खान, तिरूपती मंतावार रोहीत गुप्ता,नागेश आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

