Top News

स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त बल्हारशाह शहरात तिरंगा पदयात्रा रॅली संपन्न.....

स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त बल्हारशाह शहरात तिरंगा पदयात्रा रॅली संपन्न.....


तिरंगा पदयात्रा रॅलीमध्ये व्यायाम शाळेचे खेळाडूंनी व त्यांचे वस्ताद, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने एक पाऊल पुढे येऊन हर्षउल्हासाने सहभाग नोंदविला.....




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात व हरिश शर्मा माजी नगराध्यक्ष नगरपरिषद बल्हारशाह यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१३/०८/२०२२ रोज शनिवार ला बल्हारशाह शहरातील समस्त व्यायाम शाळा यांच्या सहकार्यातून भव्य तिरंगा पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले. 


तिरंगा पदयात्रा रॅलीचा शुभारंभ भारत माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाला. भारत माता की जय, वंदे मातरम या नाऱ्याने संपूर्ण रॅली गाजवली.या तिरंगा पदयात्रा रॅलीमध्ये व्यायाम शाळेचे खेळाडूंनी व त्यांचे वस्ताद, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहाने व जोमाने मनात मातृभूमी प्रति असलेल्या आपले प्रेम व्यक्त करण्याकरिता एक पाऊल पुढे येऊन हर्षउल्हासाने सहभाग नोंदविला. 


या पदयात्रा रॅलीला आदरणीय हरीश भैया यांनी उपस्थित युवकांना संबोधित करून मार्गदर्शन केले.या तिरंगा पदयात्रा रॅलीला  काशीनाथ सिंह, राजु दारी, इंजि.देवेंद्र वाटकर, बाळकृष्ण व्यायाम शाळा चे घनश्याम कोतपल्लीवार, नाना शिम्पूलकर आणि टीम, पाखड़ी हनुमान व्यायाम शाळा चे नाना दिवटे, डॉ. अनील बोम्मावार,रोहित ठाकूर व टीम,  किल्ला हनुमान व्यायाम शाळा चे सुरेंद्र साळवे व टीम, इंदिरा क्रीड़ा मंडळ चे किशोर चौधरी व टीम, तरुण उत्साही क्रीड़ा मंडळ चे प्रदिप कोकोडे,मनोज बहुरीया, नयन बोम्मावार आणि टीम, भवानी क्रीड़ा मंडळ चे  क्रिष्णा इटनकर, गणेश मेदांले आणि टीम, जय भारत व्यायाम शाळा चे  लक्ष्मण पोहाने, सुरेश घुबडे आणि टीम,त्रिशूल क्रीड़ा मंडळ चे गौरव पंदिलवार, प्रज्वल वांढ़रे आणि टीम, साई मित्र परिवार चे राहुल कोत्तावार, वेणू एंदगंदलावार आणि टीम, बी टी एस मित्र परिवार चे विशांक ठाकूर , हर्ष कायरकर आणि टीम व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सदर तिरंगा पदयात्रा रॅली पाखडी हनुमान व्यायाम शाळा च्या पटांगण - तरुण उत्साही क्रिडा मंडळ - इंदिर क्रिडा मंडळ - चंदन दीप भवन - हायवे रोड- डेपो एन्ट्री गेट -पुराना बस स्टॉप - रेल्वे चौक - नगरपरिषद चौक - नवीन बस स्टॅन्ड- गणपती वॉर्ड किल्ला वॉर्ड- महादेव मंदिर छाबडा बिछायत केंद्र- गांधी पुतळा चौक - माता मंदिर- मुरलीधर मंदिर या मार्गाने काढण्यात आली.

Previous Post Next Post