क्षण भराच्या आंनदासाठी गमावला तरूनाणे जीव....
रविवार सुट्टी निम्मित शेकडो लोक आनंद घ्यायला डोंगरगाव मध्यम ला येत असतात त्या दरम्यान झाली दुर्दैवी घटना....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्प येथे चार आठ ते दहा तरूण मुलं पार्टी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान ते युवक सिंचन प्रकल्पाच्या कालव्यात पोहायला गेले.या पैकी चार मुलं पाण्यात बुडाले त्यापैकी दोन मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांचा साथीदाराना यश आले. मात्र दोघांपैकी छोटू खंडेराव कुळसंगे ( वय 23 ) या यूवकाचा पाण्यात बुडल्याने दुदैवी मृत्यू झाला आहे छोटु कुळसंगे हा मागील दोन वर्षापुर्वी एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होता.तर दुसरा तरूण मनोज रामा बावणे ( वय 22 ) याला मित्रांनी बाहेर काढले मात्र नाका,तोंडात पाणी गेल्याने मनोज बावणे याची प्रकृती खालावली होती,त्याला तातळीने उपचारासाठी उप जिल्हा रूग्णालय राजूरा येथे हलविण्यात आले.विश्वसनीय सुत्रांनकळुण मिळालेल्या माहीती नुसार सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
हे दोन्ही यूवक टेबुर्वाही गावातील रहीवाशी होते.या घटनेची माहीती मिळताच विरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल चव्हाण यांच्या मार्गदर्नाखाली पुढील तपास हवालदार भुजंगराव कुळसंगे करीत आहेत.

