Top News

फॉगींग मशीनव्दारे डासांसाठी धुर फवारणी करण्यात यावी स्वराज्य आधार फाऊंडेशन,राजुरा च्या वतीने नगर परिषद ला नेवेदनातुन मागणी.....

फॉगींग मशीनव्दारे डासांसाठी धुर फवारणी करण्यात यावी स्वराज्य आधार फाऊंडेशन,राजुरा च्या वतीने नगर परिषद ला नेवेदनातुन मागणी.....



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा

सध्या पावसाळा सुरू आहे. त्यातच राजुरा शहरामध्ये नाल्यांची साफसफाई केली नाही व काही भागात नाल्यावर चेंबर नाही आहे. त्यामुळे अनेक भागात नाल्या मध्ये सांडपाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. 

त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात तसेच राजुरा शहरामध्ये डेंगू व मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. राजुरामध्ये डेंगू व मलेरियाचे रूग्णांत झपाटयाने वाढ होवू नये म्हणुन नगर परिषद ,राजुरा मार्फत तत्काळ फॉगींग मशीनव्दारे डासांची धुर फवारणी करण्यात यावी व डेंगु व मलेरिया सारख्या जिवघेण्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात यावे म्हणून दि.10-08-2022 स्वराज्य आधार फाऊंडेशन,राजुरा च्या वतीने नगर परिषद, राजुरा ला निवेदन देण्यात आले.

Previous Post Next Post