मुरर्लीधर मित्र मंडळ परिवार तर्फे दही हंडी उत्साहात साजरी,इंजि. राकेश सोमानी यांची विशेष उपस्थिती
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह येथील मुरलीधर मित्र मंडळ तर्फे दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध होते पण या वर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वस्ती विभागात एक मेव दही हंडी असल्याने नागरिकांची भरपूर प्रमाणात गर्दी येथे दिसून आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमर राहिकवार होते,प्रमुख पाहुणे इंजि. राकेश सोमानी यांच्या तर्फे पाहिले बक्षीस १००००रु. रोक बक्षीस होते,सुमित (गोलु)डोहणे यांच्या तर्फे रुग्णवाहिका सेवा होती, नीरज तिवारी यांच्या तर्फे आकर्षित (ट्रॉफी),व गोलू जैस्वाल यांच्या तर्फे सुद्धा आकर्षित(ट्रॉफी) होती तर प्रमुख उपस्थिती मारोती नांदेकर, नाना शिंपूलकर, विकास ढोडरे,असे या कार्यक्रमाची रूप रेखा होती. या कार्यक्रमाचे आयोजन श्री.मुरलीधर मित्र मंडळ यांनी केले.
या कार्यक्रमात अनेक मंडळांनी सहभाग घेतला होता, तर प्रथम पुरस्कार श्री. राम बालक आखाळा यांनी पटकावला.

