Top News

वेकोलीने डायवर्ट केलेला गोवरी पोवणी मार्ग सामान्य नागरिकांसाठी खुला करा....नीवेदणाद्वारे शिवसेनेची मागणी....

वेकोलीने डायवर्ट केलेला गोवरी पोवणी मार्ग सामान्य नागरिकांसाठी खुला करा....नीवेदणाद्वारे शिवसेनेची मागणी....



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा



गोवरी कवटाळा मार्ग मागील काही दिवसापासून बंद असून त्यामुळे नागरिकांना गोवरी पोवणी मार्गाने जावे लागत आहे. हा मार्ग अतिशय खड्डेमय असून केव्हाही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. हा मार्ग अतिशय खडतर असून वेकोलीच्या गोवरी एक्सपान्शन आणि आधीच्या खदानी मुळे पूर्ण रस्त्याला टेकला असून वेकोलीच्या नियमानुसार ही माईन्स रस्त्यापासून 35 मीटर दूर असायला पाहिजे परंतु साध्यस्थितीत तो रस्त्याला जोडला आहे. काही दिवसापूर्वी विद्यमान आमदार सुभाष धोटे आणि गोवरी कवटाळा रस्त्याचे उदघाटन केले असून सुद्धा तो मार्ग नागरिकांसाठी खुला केला नाही.

ही अतिशय गंभीर बाब असून हा मार्ग लवकरात लवकर खुला करावा या मागणीसह शिवसेना राजुरा यांच्या वतीने निवेदनसह वेकोली आणि पी डब्लू डी ला मागणी करण्यात आली.

मागणी पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर  अनिरुद्ध मेश्राम आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post