Top News

The_rescue_team_of_the_forest_department_captured_the_leopard_near_Visapur_village_in_Balharshah_taluka

अखेर‌त्या पेपर‌ मीलच्या जुन्या वसाहतीत आणी विसापुरात धुमाकुळ घालनार्या बीबट्याला जेरबंद‌ करण्यास बल्हारशाह वनविभागाला आले यश......


बल्हारशाह तालुक्यातील विसापुर गावा लगत बिबट्या ला केले वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने जेरबंद....


वन विभागा मार्फत बिबट्याच्या हालचालीच्या ठिकाणी 4 CCTV कॅमेरे, 4 ट्रॅप कॅमेरे व 3 पिंजरे लावण्यात आले होते...... 



विदर्भ माझा न्युज 24  -  बल्हारशाह 



काल दि. 24/8/2022 रोजी बल्हारशाह तालुक्यातील विसापुर गावा लगत रात्रौ 8.00 चे सुमारास एक बिबट वन्यप्राणी जेरबंद करण्यात आला.

विसापुर गावा लगत असलेल्या महापारेषण च्या परिसरात एक बिबट वन्यप्राणी धुमाकुळ घालत असल्याने विसापुर येथील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तालुका क्रिडा संकुल, विसापुर ला लागुन असलेल्या सिमेंट कॉक्रीट रोडने विसापुर येथील नागरीक व पेपर मिल,बल्हारशाह येथील कामगार या मार्गाचा अवागमना करीता वापर करीत असतांना त्यांना बिबट या वन्यप्राण्याचे दर्शन होत होते व महापारेषणच्या पडक्या इमारतीवर बिबट बसुन असल्याचे सुध्दा नागरीकांना दिसुन आले होते.


बल्हारशाह वन परिक्षेत्रातील विसापूर गावाच्या हद्दीतील  जुन्या पावर हाऊस, बल्हारशाह येथे काही दिवसा अगोदर दिवसा देखील बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते. यामुळे जिवीतहाणी होण्याची शक्यता बळावली होती. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. गावाकऱ्यांनी बिबट जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर च्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी शासनाकडे बिबट जेरबंद करण्याची मंगळवारी परवानगी मागितली. शासनाकडून परवानगी मिळताच त्यांनी सभा घेऊन बिबट जेरबंद करण्याचे निर्देश बल्हारशाह वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिले.


तसेच सदर बिबट वन्यप्राणी पेपर मील जुनी वसाहत, बल्हारशाह येथे सुध्दा धुमाकुळ घालत होता. सदर परिसरात मानव व वन्यजिव संर्घष निर्माण होवुन अनुचीत घटना घडु नये म्हणुन बिबट या वन्यप्राणाला जेरबंद करुन इतरत्र सोडण्याबाबत नागरीकांची मागणी जोरधरत होती. 

नागरीकांची मागणी लक्षात घेता बल्हारशाहचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी बिबट वन्यप्राण्याला जेरबंद करुन इतरत्र सोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन वनविभागाच्या वरिष्ट कार्यालयास सादर केला व त्यास परवानगी प्राप्त झाली. 



परवानगीच्या अनुषंगाने बिबट या वन्यप्राण्याला जेरबंद करण्याची मोहिम दिनांक. 23 ऑगस्ट 2022 पासुन राबविण्यात आली. यामध्ये 4 CCTV कॅमेरे, 4 ट्रॅप कॅमेरे व 3 पिंजरे लावण्यात आले. CCTV च्या माध्यमातुन बिबट या वन्यप्राण्याच्या हालचालीवर निगराणी ठेवण्यात येत होती.दरम्यान काल दिनांक 24 ऑगस्ट 2022 ला रात्री 8.00 वाजताच्या सुमारास बिबट जेरबंद झाल्याचे CCTV मधुन निदर्शनास आले. 

जेरबंद करण्यात आलेल्या बिबट वन्यप्राण्याला शासकीय वाहनाने वन्यजीव उपचार केन्द्र, चंद्रपुर येथे रवानगी करण्यात आली. चंद्रपुर जिल्हामध्ये आधुनिक तंत्रज्ञाणाचा मदतीने वन्यप्राणी जेरबंद करण्याची हि पहिलीच घटणा आहे. ही मोहिम बल्हारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे  यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात के. एन. घुगलोत क्षेत्र सहाय्यक बल्हारशाह,ए.एस. पठाण क्षेत्र सहाय्यक उमरी, बि. टि. पुरी, क्षेत्र सहाय्यक कळमणा व वनरक्षक आर.बि. बत्तलवार, एस.पि. कांबळे, ए.एम. चहांदे, टि.ओ. कामले आणी PRT टिम केम तुकुम, इटोली व कळमणा यांनी यशस्वी रित्या कामगीरी पार पाडली. त्याचप्रमाणे विसापुर गावातील ग्रामस्थानी सुध्दा वन विभागाच्या टिम ला सहकार्य केले.

Previous Post Next Post