सावळी सदोबा येथे बंजारा बांधवांच्या वतीने तिजं उत्साहात साजरा.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे परिसरातील पध्दतीने आज बंजारा समाजाच्या वतीने तिजं उत्साह साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी प्रत्येक गावातील नाईक, कारभारी, गावातील मुली व महिला मंडळ ,वाद्य सहित घेऊन सावळी येथे भिकू नाईक च्या घरी समाज बांधवांनी एकत्र होऊन सर्कलच्या दृष्टिकोनातून समाजाला एक दिशा देण्यासाठी समाजाचां सण हा एक पारंपारिक आहे लोकांना संदेश देण्यासाठी हा सण साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून मोठ्या थाटामाटाने हा सण साजरा करण्यात आले आहे. त्या ठिकाणापासून मिरवणुक चालू केले. मुलींनी आपल्या बंजारा भाषेमध्ये गीत गायन केले.
चाली चालीरे दयाळू विर,आज मं चालीरे मनं लेयनं आयो रे विर, आज मं चाली रे....!
अशा प्रकारे तिज़ उत्साह सुरूवात झाली त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भिकु नाईक , डॉ,रामचरण चव्हाण, माजी. बालकल्याण सभापती जि. प. सौ. ज्योती रामचरण चव्हाण, विनोद दत्ता जाधव, मिलिंद चव्हाण , बाबूसिंग पवार पुनाजी महाराज,माजी.जि.प. प्रकाश राठोड, नुरशिगं कारभारी,विठ्ठल दिपला राठोड, अनिल सिताराम पवार, पुंडलिक राठोड, सुदाम नाईक (पुरुषोत्तम नगर) बळीराम नाईक (बारभाई) , रमेश नाईक, दिलीप राठोड, कारभारी (सुभाष नगर) संजय राठोड, सुरेश राठोड, सुभाषनगर सुरेश पवार, अविनाश चव्हाण, गोविंदा आडे, असे प्रत्येक गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

