Top News

55 crore 50 lakhs in rural areas of Balharshah assembly constituency. Approval of pricing developments.

बल्हारशाह विधानसभा क्षेत्राच्‍या ग्रामीण भागात ५५ कोटी ५० लक्ष रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी.


रस्‍ते व पुलांच्‍या बांधकामाचा समावेश.


वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे फलीत.



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह


राज्‍याचे वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्हारशाह विधानसभा क्षेत्रात ५५ कोटी ५० लक्ष रू. किंमतीची रस्‍ते व पुलाची  बांधकाम मंजूर करण्‍यात आली आहे.

ग्रामीण भागातील जनतेची रस्‍ते व पुलासंदर्भातील मागणी लक्षात घेता श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला प्रयत्‍न व पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे. जुलै २०२२ च्‍या पुरवणी अर्थसंकल्‍पात मंजूर विकासकामांमध्‍ये प्रामुख्‍याने बल्हारशाह तालुक्‍यातील मानोरा-कवडजई-कोठारी रस्‍त्‍याची सुधारणा ६ कोटी रू., बल्हारशाह तालुक्‍यातील माना-नांदगांव-विसापूर रस्‍त्‍याची सुधारणा ३ कोटी ५० लक्ष रू., चंद्रपूर तालुक्‍यातील मरारसावरी-नागाळा रस्‍त्‍यावर अंधारी नदीवरील मोठया पुलाच्‍या पोचमार्गाकरिता भुसंपादन करणे ५० लक्ष रू., चंद्रपूर तालुक्‍यातील तालुका सिमा ते मुल तालुक्‍यातील टेकाडी-चिमढा-आकापूर-दत्‍तमंदीर-ताडाळा-हळदी-दहेगांव-मानकापूर-नलेश्‍वर-खालवसपेठ-चिरोली-टोलेवाही-नागाळा रस्‍त्‍याची सुधारणा ४ कोटी ५० लक्ष रू., चंद्रपूर तालुक्‍यातील दुर्गापूर-सिनाळा-वरवट-चोरगांव-मामला-बोर्डा-वलन या रस्‍त्‍याची सुधारणा ४ कोटी रू., मुल तालुक्‍यातील उमरी तुकूम-आंबेधानोरा-डोंगरहळदी-सुशी-नलेश्‍वर-मानकापूर-हळदी-चिचाळा-फिस्‍कुटी-चांदापूर रस्‍त्‍याची सुधारणा १ कोटी ८० लक्ष रू., मुल तालुक्‍यातील पेटगांव-भादुर्णी-मारोडा-मुल-चिचाळा-भेजगांव रस्‍त्‍याची सुधारणा १९ कोटी, मुल तालुक्‍यातील पेटगांव-राजोली-पाथरी रस्‍त्‍याची सुधारणा करणे ३ कोटी ९० लक्ष रू, पोंभुर्णा तालुकयातील वडकुली-चेक बल्हारशाह-चिंतलधाबा-केमारा-भटारी ते नविन राष्‍ट्रीय महामार्गाची सुधारणा ३ कोटी रू., मुल तालुक्‍यातील टेकाडी-चिमढा-आकापूर-दत्‍तमंदीर-ताडाळा-हळदी-दहेगांव-मानकापूर-नलेश्‍वर-खालवसपेठ-चिरोली-टोलेवाही-नागाळा या रस्‍त्‍यावर लहान पुलाचे बांधकाम करणे २ कोटी रू., मुल तालुक्‍यातील नवेगांव-गांगलवाडी-भादुर्णी-पडझरी-सोमनाथ-मारोडा या रस्‍त्‍यावर लहान पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ८० लक्ष रू., एमआयडीसी-दाताळा चंद्रपूर रस्‍त्‍यावरील कॅबल स्‍टेड उंच पुलाच्‍या पोचमार्गाचे सिमेंट कॉंक्रीटीकरण, चौपदरीकरण व विद्युत वाहीनींचे स्‍थलांतरण करणे ५ कोटी ५० लक्ष रू. अशी ५५ कोटी ५० लक्ष रू. किंमतीची विकासकामे मंजूर करण्‍यात आली आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने ग्रामीण भागातील जनतेच्‍या जिव्‍हाळयाची रस्‍ते व पुलाच्‍या बांधकामाची कामे मार्गी लागल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post Next Post