निम्न वर्धा प्रकल्पाचे एकूण 07 गेट प्रत्येकी 30 से.मी. ने उघडले......
नदी काठावरील गावकर्यांना सतर्कतेचा इशारा....
विदर्भ माझा न्युज 24 - वर्धा
विदर्भात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील निम्म वर्धा प्रकल्पाचे आज दि.१०/७/२०२२ रोजी 33 पैकी 07 दरवाजे सकाळी 9:30 वाजता प्रतेकी 30 से.मी. ने उघडन्यात आले आहे.
प्रकल्पाचे दरवाजे उघडुन 186 क्युमेक विसर्ग आज वर्धा नदी जलपात्रात सोडण्यात आले आहे त्यामुळे नदीकाठारील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासना तर्फे देण्यात आला आहे.
