देवदुत बनुन आले पोलिस हेडकॉन्स्टेबल दिवाकर पवार व विरूर पोलिस चमु........
युवकाला मृत्युच्या मुखातुन काठले बाहेर....
सोशल मिडीया च्या माध्यमातुन झाली मदत.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
सामान्यांच्या सुरक्षते च्या सोबतच पोलिस मानवेता धर्म जपत नागरीकांचे हृदय पन जिंकत आहे,विरूर पोलिस स्टेशन मध्ये पोलिसांचा असाच एक देवरूप बघायला मिळाला,हे कार्य कोन्या पोलिस खात्याच्या विभागाच्या क्षेत्राचे आहे या प्रशनाला मागे सारून चालत्या ट्रेनमधून खाली पडलेल्या जखमी तरुणाला मानवतेचे कर्तव्य बजावत त्या रक्ताने भिजलेल्या तरुणाचे प्राण वाचवून विरुर पोलिसांनी आपल्या माणुसकीचा दाखला दिला आहे.
काल रात्री राजुरा तालूका अंतर्गत, बिहार येथील रहिवासी, शैलेश कुमार राय, जिल्हा कैमूर, वय 35 हे चालत्या ट्रेनमधून विरूर स्टेशनच्या रेल्वे प्लॅटफॉर्मखाली पडले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या विरूरचे रहिवासी बनी पाला यांचे रेल्वे रुळाच्या कडेला रक्ताने भिजलेली स्थितीत जखमी युवकाकडे नजर गेली आणी पाल यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला,पण रेल्वे कर्मचार्यांची उदासीनता पाहून, पालाला जखमी तरुण जिवंत दिसला, विरूर सिटी अपडेट व्हाट्सॲप ग्रुपमध्ये त्याचे फोटो टाकून सोशल मीडियावर व्हायरल करून मदतीची याचना केली.
त्यामुळे विरूर पोलिसात कार्यरत हेडकॉन्स्टेबल दिवाकर पवार यांनी माणुसकी दाखवत दहा मिनिटाच्या आत आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचून विरूर ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला खाजगी वाहनात बसवून प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर येथे आणले.
मात्र, जखमी तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रेफर करण्यात आले.
रेल्वे यार्डा मध्ये घडलेल्या या घटनेमुळे सदर जखमींवर उपचाराची जबाबदारी रेल्वे पोलीस विभागाची होती, मात्र वेळीच गंभीर जखमींला महाराष्ट्र पोलीस दलातील हेडकॉन्स्टेबल दिवाकर पवार, विजू मुंडे, अतुल सहारे यांनी शर्थीचे प्रयत्न करून वेळीच मानवतेची ओळख करून देत एका अनोळखी तरुणाचा जीव वाचवला, विरूर पोलिसांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

