Top News

बल्लारशाह नगर परिषद द्वारा वित्तीय योजनेअंतर्गत पाच टक्के निधी दिव्यांगांना वाटप.

बल्लारशाह नगर परिषद द्वारा वित्तीय योजनेअंतर्गत पाच टक्के निधी दिव्यांगांना वाटप.


दिव्यांग बांधवांना चंदन सिंह चंदेल व हरिश शर्मा यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण....



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग कृती आराखडा-2001 नुसार बल्लारशाह नगर परिषदेच्या सन 2021-22 या वार्षिक वित्तीय योजने अंतर्गत एकूण निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कल्याण करिता आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठ पुराव्याने दिनांक 5/7/2022 रोजी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते व बल्लारशाह नगर परिषदेचे माजी अध्यक्ष हरीश शर्मा तसेच मुख्याधिकारी देवळीकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना संबोधित करताना या निधीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यास  वापर करावा असे सांगण्यात आले.या प्रसंगी न.प.बल्लारशाहचे उप मुख्याधिकारी कातकर, माजी स्वच्छता सभापती येलय्या दासरफ हे उपस्थित होते.न.प.कार्यालय अधीक्षक सौ.संगीता उमरे यांनी कार्यक्रमाचे संचालण केले. यावेळी दिव्यांग बांधवांनी मान्यवरांचे आभार मानले.

Previous Post Next Post